रोंजन सोढीला यंदाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार

August 13, 2013 3:09 PM0 commentsViews: 190

ronjan sodhi13 ऑगस्ट : क्रीडा क्षेत्रात सर्वोच्च मानला जाणारा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार नेमबाज रोंजन सिंग सोढीला जाहीर झालाय. डबलट्रॅप शुटिंग प्रकारात सोढीनं दोनवेळा वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान पटकावलाय. तर वर्ल्ड शुटिंग स्पर्धेत गेल्या वर्षी रोंजननं सिल्व्हर मेडलची कमाई केली होती. त्याच्या कामगिरीची दखल घेत त्याला हा पुरस्कार जाहीर झालाय. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार पटकावणारा सोढी हा सहावा क्रीडापटू ठरला आहे.

close