भारतापुढे 247 धावांचं आव्हान

January 28, 2009 8:31 AM0 commentsViews: 2

28 जानेवारी, श्रीलंका दम्बुला वन डे मध्ये श्रीलंकेने भारतासमोर विजयासाठी 247 रन्सचं आव्हान ठेवलंय. सनथ जयसूर्याची 28 वी सेंच्युरी हे श्रीलंकन इनिंगचं वैशिष्ट्य ठरलं. वन डे क्रिकेटमधले 13, 000 रन्सही आज त्याने पूर्ण केले. सचिन तेंडुलकर नंतर अशी कामगिरी करणारा तो दुसरा बॅट्समन. आजही दिलशान पहिल्याच ओव्हरमध्ये आऊट झाल्यावर जयसूर्या आणि कुमार संगकारा यांची जोडी जमली. दुसर्‍या विकेटसाठी त्यांनी 117 रन्सची बहुमोल पार्टनरशिप केली. मुनाफ पटेल, झहीर आणि ईशांतच्या बॉलिंगचा जयसूर्यानं नेटानं मुकाबला केला. झहीरच्या बॉलिंगवर दोन रन्स घेत त्याने सेंच्युरी पूर्ण केली. यात त्याने दहा फोर आणि एक सिक्स ठोकला. त्यानंतर मात्र झहीरच्या बॉलिंगवर तो 107 रन्स करुन आऊट झाला. जयसूर्य वगळता इतर श्रीलंकन बॅट्समन मात्र फारशी कमाल दाखवू शकले नाहीत. संगकाराने 44 तर महारुफने 35 रन्स केले. अखेरीस श्रीलंकेने पन्नास ओव्हर्समध्ये सात विकेटवर 246 रन्स केले. भारतातर्फे ईशांत शर्माने तीन विकेट घेतल्या.

close