हॅपी बर्थ डे श्रीदेवी

August 13, 2013 6:48 PM0 commentsViews: 684

बॉलीवूड स्टार श्रीदेवीचा आज पन्नासावा वाढदिवस…19 च्या दशकात आपल्या अदाकारीने तिने अनेकांना घायाळ केलं. तामिळनाडूच्या मीनमपट्टी या छोट्याशा गावात राहणार्‍या श्रीदेवीने 1967साली वयाच्या तेराव्या वर्षी बालकलाकार म्हणून कारकिर्दीला सुरूवात केली. त्यानंतर ‘हिम्मतवाला’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली..मग तिने मागे वळून पाहिलं नाही..चांदणी, चालबाज,लम्हे, सदमा, मि.इंडिया,जुदाई असे अनेक सुपरहिट सिनेमे तिने दिले. दिग्दर्शक बोनी कपूर यांच्याशी विवाह केल्यानंतर काही काळ ती पडद्याआड गेली. पण मागिल वर्षी श्रीदेवीने ‘इंग्लिश विग्लिश’ या सिनेमातून पुन्हा कमबॅक केलं…200 पेक्षा अधिक सिनेमात श्रीदेवीने आजपर्यंत काम केलंय..श्रीदेवीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

 

सौजन्य -आयबीएन लाईव्ह डॉट कॉम
 

close