प्रमोद मुतालिकला कोर्टात हजर करणार

January 28, 2009 8:32 AM0 commentsViews: 2

28 जानेवारी, मंगलोर मंगलोर पब हल्ल्यातला आरोपी आणि श्रीराम सेनेचा प्रमुख प्रमोद मुतालिक याला देवगिरी कोर्टात हजर केलं जाणार आहे. त्याच्याबरोबर दहा संशयितांनाही अटक करण्यात आलीय. चिथावणीखोर भाषणं आणि हिंसाचार यासारख्या अनेक प्रकरणात मुतालिक पोलिसांना हवा होता. दरम्यान, कर्नाटक सरकार आणि भाजपनं श्रीराम सेनेशी आपला संबंध नसल्याचं स्पष्ट केलंय. मंगलोरमध्ये पबमधल्या महिलांना श्रीराम सेनेनं मारहाण केली होती. दरम्यान व्हँलेटाईन डेलाही आपला विरोध असल्याचं मुतालिक यानं सांगितलंय.

close