अन्न सुरक्षा विधेयक गरिबांना उपाशी ठेवणारे-मोदी

August 13, 2013 8:05 PM0 commentsViews: 700

13 ऑगस्ट : गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे प्रचार प्रमुख नरेंद्र मोदी यांनी अन्न सुरक्षा विधेयकाला तीव्र विरोध केलाय. हा कायदा गरिबांना अन्न सुरक्षेची नाही तर त्यांना उपाशी ठेवण्याची हमी देणार आहे अशी बोचरी टीका नरेंद्र मोदींनी केलीय. तसंच यूपीए सरकारला गरिबांशी काहीही देणं घेणं नाही. यांचेच नेते 5 रुपयात जेवण मिळेल, 12 रुपयात मिळेल अशी थट्टा करतात त्यामुळे यांना गरिबांचं दुख काय कळणार? यांच्या नेत्यांची मानसिकता या विधेयकावरून स्पष्ट दिसून येते. पंतप्रधान तुम्ही अर्थतज्ज्ञ आहात तर गरिबांच्या परिस्थितीचा नीट अभ्यास करा असा खोचक सल्लाही मोदींनी दिला.

close