काँग्रेस-राष्ट्रवादीत जागावाटपावरून जुंपली

August 13, 2013 8:03 PM1 commentViews: 738

ncp jaga vatp13 ऑगस्ट : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये जागावाटपाचा वाद आता रंगलाय. जागावाटपाचा 22-26 फॉर्म्युला कायम राहील, 22 जागांवर राष्ट्रवादी निवडणूक लढवेल तर 26 जागांवर काँग्रेस लढवेल अशी घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी केली.

याबाबत दिल्लीत दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झालीय आणि चर्चा करून हा निर्णय घेण्यात आल्याचं जाधव यांनी म्हटलंय. पण जाधवांचा हा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी खोडून काढलाय.

आम्ही चर्चा करण्यासाठीच थांबलो नाही. कुठली जागा कोणी लढवायची किती जागांवर लढवयाची याची आकडेवारी सांगणं याला काही आधार नाही असं माणिकराव ठाकरेंनी स्पष्ट केलं.

काँग्रेसला 2009 मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीपेक्षा 20 जास्त जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे यावेळी काँग्रेसने 2 अधिक जागा मिळाव्यात अशी मागणी राष्ट्रवादीकडे केलीय. पण राष्ट्रवादीला हे मान्य नाही त्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

  • Sagar Janaskar

    Khurchi sodu naka… aani Khurchi bhetalyavar path firava….

close