म्हाडाची दिवाळीमध्ये 2000 घरांची सोडत

August 13, 2013 7:08 PM0 commentsViews: 339

13 ऑगस्ट : मुंबईत घरं घेणार्‍यासांठी एक खुशखबर आहे…म्हाडानं सर्वसामान्यांसाठी दिवाळीची भेट आताच जाहीर केली आहे. दिवाळीमध्ये तब्बल 2000 म्हाडाच्या घरांची लॉटरी निघणार असल्याची घोषणा गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी केली. गेल्या कित्येक वर्षांपासून मे महिन्यात म्हाडाची लॉटरी निघत असते. मात्र यावेळी ही प्रथा मोडीत काढून दिवाळीत मुंबईकरांच्या आनंदात आणखी भर घालण्याचा प्रयत्न म्हाडा करणार आहे. मात्र मुंबईत कोणत्या भागात घरांची सोडत निघणार आहे हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे.

close