मीरारोडमध्ये प्रियकरानं केला प्रेयसीचा खून

January 28, 2009 9:24 AM0 commentsViews: 6

28 जानेवारी, मुंबईमुंबईतल्या मिरारोडजवळ पालोमा फर्नांडीस या गोव्याच्या मुलीचा आज खून झालाय. या खुनात तिचा 20 वर्षांचा प्रियकर इग्विनो माटीस याचाच हात आहे. पालोमा आणि इग्वीनो दोघंही मालाडच्या जे पी मॉर्गल कॉल सेंटरमध्ये काम करत होते. एक वर्षांपूर्वी इग्विनोनं मिरारोडमध्ये पालोमाला घर घेऊन दिलं होतं. या दोघांमधल्या वादातून हा खून झाला. आज पहाटे साडेतीन वाजता इग्विनोनं पालोमावर सुर्‍यानं खूनी हल्ला केला. त्यानंतर त्यानं स्वत:वरही वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात पालोमा ठार झालीय. तर इग्विनो जखमी असून त्यावर बोरिवलीच्या भगवती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

close