प्रचंड गदारोळात अन्नसुरक्षा विधेयक सादर

August 14, 2013 4:00 PM0 commentsViews: 255

Image img_223982_loksabha2_240x180.jpg14 ऑगस्ट : अखेर वादग्रस्त अन्न सुरक्षा विधेयक आज लोकसभेत मांडण्यात आलं. प्रचंड गदारोळातच केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री के व्ही थॉमस यांनी हे विधेयक मांडलं. पण या विधेयकावर चर्चा होण्याची शक्यता मात्र कमी आहे.

अन्न सुरक्षा विधेयकावर सरकारनं आज चर्चा ठेवली होती. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी या स्वतःच काँग्रेसतर्फे चर्चेचं नेतृत्व करणार होत्या. त्यासाठी लोकसभेत सर्व खासदारांनी उपस्थित रहावे असा व्हिप काँग्रेसनं काढला होता. पण प्रचंड गदारोळामुळे या विधेयकावर चर्चेची शक्यता नाहीय.

मात्र, गोरखालँड, सीमांध्रच्या खासदारांचा तेलंगणाला विरोध अशा मुद्द्यांवरून सभागृहात गोंधळ होतोय. विरोधकही हे विधेयक आहे तसं स्वीकारायला तयार नाहीत. हे विधेयक काँग्रेससाठी महत्त्वाचं आहे. ते मागच्या आठवड्यातच लोकसभेत मांडण्यात आलं होतं. मात्र, वेगवेगळ्या मुद्द्यांवरून लोकसभेत गोंधळ होऊन कामकाज होत नाहीये. त्यामुळे आज तरी ही चर्चा व्हावी अशी काँग्रेसची इच्छा आहे.

close