कांद्याची साठेबाजी करणार्‍यांवर होणार FIR दाखल

August 14, 2013 2:10 PM0 commentsViews: 326

Image img_135032_onion457_240x180.jpg14 ऑगस्ट : कांद्याची साठेबाजी करणार्‍या व्यापारी किंवा साठेबाजांवर एफआयआर (FIR) दाखल करणार अशी घोषणा राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलीय. 15 दिवसांत कांद्याचे भाव कमी होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मागील आठवड्यात कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली. पाच हजार क्विंटल असा कांद्याला भाव सुरू आहे. त्यामुळे राज्यभरात कांदा 50 ते 60 रूपये किलोने विकला जात आहे.

अगोदरच महागाईने किचनच बजेट कोसळल्यामुळे कांद्यानं त्यात आणखी भर टाकलीय. मात्र, कांद्याची साठेबाजी करून नफेखोरी करण्याचा प्रकार आजवर घडत आले. त्यामुळे साठेबाजी रोखण्यासाठी कृषिमंत्र्यांनी फौजदारी गुन्ह्याची घोषणा केली.

close