राज्य कंत्राटदार चालवतात -राज ठाकरे

August 14, 2013 4:35 PM1 commentViews: 1930

raj on yuti14 ऑगस्ट : महाराष्ट्र राज्य सध्या कंत्राटदार चालवताय. कंत्राटदार स्वत: टेंडरवर बसतात,आपआपसात वाटून घेतात आणि या सगळ्यात राजकीय पक्ष सामिल असतात. आज हायकोर्टाने दखल घेतली पण तरीही खड्डे बुजवले जाणार नाही. सहा महिन्यांनी पुन्हा खड्डे होणार आणि पुन्हा बुजवले जाणार ही ‘नेव्हर एंडिंग स्टोरी’ आहे अशी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.

तसंच नाशिकमधल्या खड्‌ड्यांना आधीचे सत्ताधारी जबाबदार आहे. मनसेच्या सत्ता येऊन दीड वर्ष झाली त्यामुळे खड्‌ड्यांचं खापर माझ्यावर फोडू नका असंही राज यांनी सांगितलं. पण लवकरच नवे टेंडर काढणार असून यासाठी नावाजलेल्या कंपन्यांना कंत्राटबद्दल विचारणा केली जाणार आहे. यातूनच नवे आणि चांगले रस्ते बांधणार असल्याचंही राज यांनी स्पष्ट केलं.
 

वेगळ्या विदर्भाची गरज नाही

वेगळ्या विदर्भाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोध केलाय. तुम्ही राज्यकर्त्यांचा राग राज्यावर काढू नका, असं मत त्यांनी व्यक्त केलंय. मुंबईत झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

  • hanumant waykar

    नाही. कारण कोट्‍यावधीची संपत्ती असणार्‍या आमदारांना ४०००० ची पेन्शन देणे चुकीचे आहे. अनेक घोटाळे करून जनतेची तिजोरी लुटतात. आणिविरोधकांचा आवाज बंद करण्यासाठी ही…

close