पवारांना केला निवडणूक लढवण्याचा आग्रह

January 28, 2009 4:40 PM0 commentsViews: 4

28 जानेवारी, पुणे पुणे जिल्ह्यातल्या शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सभा झाली. या सभेत पावारांना निवडणूक लढवण्याचा आग्रह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि जनेतेनं केला. त्यावर पवारांनी लवकरच निर्णय जाहीर करू असं म्हणाले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार खासदारकीची निवडणूक लढवणार की मागच्या दारानं संसदेत जाणार सगळ्यांना पडलेल्या या प्रश्नाचं उत्तर खुद्द शरद पवारच देण्याची शक्यता होती. याचवेळी ते त्यांच्या उमेदवारीबद्दलही बोलणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. आपल्या उमेदवारीबद्दल फारसं न बोलणारे पवार, आता शिरूरच्या सभेत नक्की काय बोलणार याबद्दल राजकीय पक्षांबरोबर सामान्यांमध्येही उत्सुकता लागून होती.

close