पाकविरोधात ठराव मंजूर,काश्मीर भारताचा अविभाज्य भाग !

August 14, 2013 2:08 PM0 commentsViews: 315

Image img_214512_loksabhaclose_240x180.jpg14 ऑगस्ट : नियंत्रण रेषेवर भारतीय जवानांच्या झालेल्या हत्येमध्ये पाकिस्तानी लष्कराचाच हात होता आणि त्यात कोणताही संशय नसल्याचा पाकविरोधात ठराव आज संसदेत एकमतानं मंजूर करण्यात आला.

पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय सीमांचा आदर करावा. पाकव्याप्त काश्मीरसह संपूर्ण काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे असं या ठरावात भारतानं ठणकावून सांगितलंय.

ठरावातला मजकूर विरोधकांशी चर्चा करून ठरवण्यात आलाय. पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीनंही मंगळवारी भारताविरोधात ठराव मंजूर केला होता. आणि त्यात भारलाचा नियंत्रण रेषेचा भंग करत असल्याबद्दल फटकारलं होतं.

close