सावधान, H1N1ची लक्षणं आढळल्यास घरीच थांबा !

August 14, 2013 7:35 PM0 commentsViews: 517

h1 n114 ऑगस्ट : H1 N 1 अर्थात स्वाईन फ्लू राज्यात हळूहळू पुन्हा डोकं वर काढू लागलाय. ज्या विद्यार्थ्यांना सर्दीसह अल्पज्वर, अंगदुखी, खवखवणे, डोकेदुखी, उलट्या, आणि जुलाब यासारखी लक्षण आढळून आली, अशा विद्यार्थ्यांना सात दिवस रजा घ्यावी. आणि घरी राहून उपचार घ्यावा असा सल्ला आरोग्य विभागाने दिलाय.विद्यार्थ्यांमध्ये H1 N 1 चा संसर्ग टाळण्यासाठी राज्याच्या आरोग्यविभागाने परिपत्रक काढलं आहे.

 

राज्यातल्या प्रत्येक आरोग्य अधिकार्‍यांना आणि शल्य चिकित्सकांनाही या परिपत्रकाद्वारे सुचना देण्यात आल्या आहेत. राज्यात H 1 N 1 ची लागण सुरू झाल्या पासून आतापर्यंत पुणे परिमंडळात 49 जणांचा मृत्यू झाला. H1 N 1 सिसजन फ्लू प्रमाणे वर्तन करत असल्यांने आरोग्या विभागाकडून याचा संसर्ग टाळण्या करिता या उपाय योजना सुचविण्यात आल्या आहेत.
नागरिकांना आवाहन

  • विद्यार्थ्यांत H1 N 1 ची लक्षण आढळल्यास सात दिवस घरी राहावे आणि लोकांमध्ये मिसळू नये
  • ज्या उपक्रमात / कार्यक्रमात विद्यार्थी मोठ्या प्रमाणात एकत्र येतील असे उपक्रम शक्यतो टाळा
  • विद्यार्थी, शिक्षक तसेच शिक्षण संस्था मध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांमध्ये H1 N 1 ची लक्षण आढळल्यास त्यांना देखील घरी राहून उपचार घ्यावा
close