आठवणीतले विलासराव

August 14, 2013 8:59 PM0 commentsViews: 252

14 ऑगस्ट : दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा आज पहिला स्मृती दिन. या निमित्तानं आज मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये स्मृती व्याख्यानमालेची सुरूवात करण्यात आली. ज्येष्ठ पत्रकार अरूण टिकेकर यांचं ”संस्कृतीच्या शोधात आपला समाज ” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. त्याआधी मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवरांनी विलासरावांच्या आठवणींना उजाळा दिला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, विधान परिषद सभापती शिवाजीराव देशमुख, विरोधी पक्ष नेते विनोद तावडे, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आणि कृषी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विलासरावांच्या आठवणींना उजाळा दिला. या वेळी सर्वच क्षेत्रातला विलासरावांचा मित्र परिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता.

close