रणरागिणीवर हल्ला करणारा लांडगा ठार

August 14, 2013 9:44 PM0 commentsViews: 214

hingoli landga14 ऑगस्ट : हिंगोली जिल्ह्यातल्या येहळेगाव सोळके इथं राहणार्‍या 37 वर्षांच्या पलिन्काबाई शेतात काम करत असताना पाठीमागून अचानक एका लांडग्यानं हल्ला केला. मदतीसाठी आजुबाजुला कुणीही नव्हतं.

पण अशा बिकट प्रसंगी त्यांच्या हातात असलेलं निंदणीचं खुरपं हत्यार मदतीला धावून आलं. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी या हत्याराने लांडग्यावर पूर्ण ताकदीने हल्ला चढवला. त्यांच्यातली थरारक झुंज तब्बल 10 मिनिटं चालली.

अखेर या जीवन मरणाच्या लढाईत लांडग्याचा पराभव झाला आणि पलिन्काबाईंचा विजय झाला. लांडगा ठार झाला मात्र बहादूर पलिन्काबाई या झुंजीत गंभीरपणे जखमी झाल्या. त्यांना तातडीनं हिंगोलीतल्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

close