‘सिंधुरक्षक’चे 18 नौसैनिक बेपत्ता, शोधकार्य सुरूच

August 15, 2013 1:06 PM0 commentsViews: 483

sindhu15 ऑगस्ट : नौदलाच्या आयएनएस सिंधुरक्षक या पाणबुडीवर स्फोट झाल्यानंतर अजूनही रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. स्फोटानंतर 30 तासांनी पाणबुडीच्या आतील तापमान कमी झाल्यानंतर नेव्हीच्या स्क्युबा डायव्हर्सना आतमध्ये जाता आलंय. पण झालेला स्फोट तीव्र क्षमतेचा असल्यानं आतील काही भाग वितळून गेलाय.

त्यामुळे पाणबुडीच्या आत अडकलेल्या जवानांचा शोध घेणं कठीण बनलंय. अशा परिस्थितीत जवान जिवंत असण्याची शक्यता नाही. लाल किल्ल्यावरून देशाला संबोधताना पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देखील पाणबुडीत अडकलेले जवान शहीद झाल्याची शक्यता वर्तवलीय. या परिस्थितीनंतरही नेव्हीचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू राहणार असल्याचं नौदलानं स्पष्ट केलंय.

close