सीमारेषेवर पाककडून पुन्हा गोळीबार,3 जवान जखमी

August 15, 2013 4:12 PM0 commentsViews: 632

Image img_227462_loc345634_240x180.jpg15 ऑगस्ट : देशभरात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होतं आहे मात्र नियंत्रण रेषेवर पाकस्तिनानची कुरापत सुरूच आहे. पाकिस्तानी सैन्यांनं पुन्हा एकदा नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. पाकिस्ताननं आज दोनदा शस्त्रसंधीनं उल्लंघन केलं. पाकिस्ताननं नियंत्रण रेषेजवळ असलेल्या पूँछ जिल्हातल्या बालाकोटमध्ये केलेल्या गोळीबारात तीन जवान जखमी झाले असल्याची माहिती मिळतीय.

दुसर्‍या एका घटनेत काल रात्री पाकिस्ताननं मेंढार सेक्टरमध्ये जवळपास 2 तास गोळीबार केला. सीमेवरचे जवान मात्र डोळ्यात तेल घालून सीमेचं रक्षण करताहेत. दहा दिवसांपूर्वी पाकिस्तानी सैनिकांनी भारताच्या 5 जवानांची हत्या केली होती.

तेव्हापासून पाकिस्ताननं शस्त्रसंधीचा 15 वेळा भंग केलाय. भारताच्या संयमाला मर्यादा आहेत, असा कडक संदेश राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पाकिस्तानला दिला होता.तर आज पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही पाकिस्तानचे हल्ले खपवून घेतले जाणार नाही असा दम भरला होता. मात्र त्यानंतरही पाकिस्तानची आगळीक सुरूच आहे.

close