माणिकरावांचं घूमजाव, मंत्र्यांना उमेदवारी देणार !

August 15, 2013 9:32 PM0 commentsViews: 97

15 ऑगस्ट : लोकसभा निवडणुकीत मंत्र्यांना उमेदवारी देण्याची वेळ येणार नाही, असं म्हणणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी यूटर्न घेतलंय. गरज पडली तर मंत्र्यांना निवडणुकीत उतरवू असा नवा खुलासा माणिकरावांनी केला. रायगड येथे वचनपूर्ती मेळाव्यात त्यांनी ही भूमिका स्पष्ट केलीय. जिल्ह्यातील सर्वांच लक्ष लागलेल्या रायगड लोकसभा आणि पेण विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडणार नाही हे देखील माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. या मेळाव्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण देखील उपस्थित होते.

close