आघाडीत 26-22 च्या फॉर्म्युला फायनल

August 16, 2013 2:51 PM0 commentsViews: 589

Image img_201832_aghadi_240x180.jpg16 ऑगस्ट : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस -राष्ट्रवादीच्या जागावाटपाचा आधीचाच फॉर्म्युला कायम राहणार आहे. यावर खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच शिक्कामोर्तब केलंय.

काँग्रेस 26 जागा तर राष्ट्रवादी 22 जागांवर आपले उमेदवार उभे करेल. हा 26-22 चा फॉर्म्युला काँग्रेस हायकमांडशी चर्चा करुनच निश्चित झालाय असं शरद पवारांनी जाहीर केलंय. त्याचवेळी जागा वाटपावरून त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंची खिल्ली सुद्धा उडवली.

जागा वाटपाचा फॉर्म्युला दिल्लीत काँग्रेसच्या हायकमांडशी बोलुनच ठरलाय त्यामुळे माणिकराव ठाकरे किंवा काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या प्रश्नांना मी उत्तरं देणार नाही असं म्हणत शरद पवारांनी प्रदेश काँग्रेसला सुनावलंय.

close