चोरीचा आळ घेऊन महिलेला विवस्त्र करून मारहाण?

August 16, 2013 1:08 PM0 commentsViews: 787

woman marhan16 ऑगस्ट : एकीकडे स्वातंत्र्य दिनाची तयारी सुरू होती तर दुसरीकडे पुरोगामी महाराष्ट्रात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलीय. स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या दिवशी इंदापूरमधल्या राजवडीमध्ये चोरीचा आळ घेऊन एका महिलेला विवस्त्र करून मारहाण करण्यात आल्याचा आरोप पीडित महिलेनं केलाय.

तसंच तिला विजेचा शॉक देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही या महिलेनं केलाय. या घटनेबाबत पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवलाय. या प्रकरणी आरोपी बाळू शेलार याला आज अटक करण्यात आलीय.

ही महिला वैदु समाजाची आहे. ती गृहोपयोगी वस्तू, दागिने विकते. या महिलेनं बाळू शेलार यांच्या मुलाच्या हातातली सोन्याची मनगटी चोरल्याचा आरोप या महिलेवर ठेवण्यात आलाय.

दरम्यान, याघटनेची गंभीर दखल सहकार मंत्री आणि इंदापूरचे आमदार हर्षवर्धन पाटील यांनी घेतलीय. घटनेच्या चौकशीचे आदेश दिल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी आयबीएन-लोकमतशी बोलताना सांगितलं.

close