लोकलमध्ये सापडली 22 जिवंत काडतुसं

August 16, 2013 1:07 PM0 commentsViews: 374

mumbai local16 ऑगस्ट : मुंबईतील जोगेश्वरी इथं रेल्वे यार्डात उभ्या असलेल्या लोकलमध्ये 22 जिवंत काडतुसं सापडल्याची धक्कादायक घटना घडलीय.

पहाटे या लोकमध्ये साफसपाई करताना सफाई कामगारांना एका पॅकेटमध्ये ही काडतुसं सापडली. पॉइंट 38 बोअरची ही काडतुसं असून आरपीएफ आणि जीआरपीचे जवान वापरत असतात. याबाबत रेल्वे पोलीस अधिक तपास करीत आहेत.

close