उद्धव ठाकरेंची अंतुलेंवर टीका

January 28, 2009 4:41 PM0 commentsViews: 1

28 जानेवारी महाडशिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची महाडमध्ये सभा झाली. या सभेतील भाषणात उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री ए. आर. अंतुले यांच्यावर कडाडून हल्ला केला. मुंबई हल्ल्यातल्या शहीद पोलिसांच्या मृत्यूबाबत अंतुलेंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं त्यावर उद्धव यांनी टीका केली. शिवसेना धर्मभेद करत नाही, जो देशभक्त तो भारतीय असं उद्धव ठाकरे म्हणाले. राष्ट्रवादी आणि काँग्रेस निवडणुकीपूर्वी भांडतात आणि मग सत्तेसाठी एकत्र येतात अशी टीकाही त्यांनी केली. महाड इथल्या उद्धव ठाकरे यांच्या सभेला चांगला प्रतिसाद मिळाला. येत्या काही दिवसात निवडणुकांच्या तारखा निश्चित होतील. त्यादृष्टीने उद्धव ठाकरे यांची ही महाडमधली सभा म्हणजे शिवसेना खासदारांच्या प्रचारासाठी आणि शक्ती प्रदर्शनासाठी घेतलेली सभा म्हणता येईल. लोकसभेच्या जागावाटपाबाबत अजूनही शिवसेना आणि भाजप युतीमध्ये निर्णय झालेला नाही त्यामुळे ही सभा म्हणजे भाजपवर दबाव टाकण्याचा प्रयत्नही म्हणता येईल. महाड इथल्या सभेत शिवसेना नेते खा. मनोहर जोशी, खा.अनंत गीते यांचीही भाषणं झाली.

close