NCP नगरसेविका बोडकेंच्या पतीकडे सापडले 3 पिस्तुल

August 16, 2013 5:42 PM0 commentsViews: 912

16 ऑगस्ट : पुण्याच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका मनिषा बोडके यांचे मिस्टर संतोष बोडके याच्याकडे 3 गावठी पिस्तुलं आणि 12 राऊंड सापडले. या प्रकरणी त्याला स्वारगेट पोलिसांनी अटक केलीय. याच प्रकरणात संतोष परदेशी यालाही अटक करण्यात आलीय. परदेशीही सारसबाग परिसरात असताना त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता हे पिस्तूल आपल्याला संतोष बोडके यानं दिल्याचं सांगितलं. यानंतर पोलीस तपासादरम्यान संतोष बोडके कडेही दोन पिस्तुलं सापडली. दोघांनाही शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात येणार आहे. संतोष बोडके याच्यावर यापुर्वी खून आणि दंगल असे दोन गुन्हेे दाखल आहेत.

close