खड्डे बुजवणार्‍या 95 लाखांच्या मशिन्स धूळ खात

August 16, 2013 5:47 PM0 commentsViews: 278

16 ऑगस्ट : मुंबईच्या रस्त्यावर खड्‌ड्यांचं साम्राज्य पसरलंय. खड्‌ड्यांच्या मुद्यावरुन राजकारणही रंगतेय. पण हे खड्डे बुजवण्यासाठी अजूनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यातच मुंबई महापालिकेनं गेल्यावर्षी खड्डे भरण्यासाठी मागवलेल्या जेट पॅचर मशिन्स धूळ खात पडून असल्याचं समोर आलंय. तब्बल 95 लाख रूपये खर्च करुन महापालिकेनं या मशिन्स मागवल्या होत्या. पण पहिल्याच पावसाळ्यात त्या मशिन्समधे बिघाड झाला. तेव्हापासून जेट पॅचर मशिन्स तशाच धूळ खात पडून आहेत. या मशिन्सची दुरुस्ती करण्याची तसदी सुद्धा महापालिकेनं घेतलेली नाही.
ठळक मुद्दे

– मुंबईतल्या जेट पॅचर मशिन्स धूळ खात
– रस्त्यांवरचे खड्डे भरण्यासाठी गेल्या वर्षी मागवल्या मशिन्स
– 95 लाख रुपये खर्च करून महापालिकेनं मागवल्या मशिन्स
– पहिल्याच पावसाळ्यात बिघडल्या मशिन्स
– महापालिकेचं मशिन्स दुरुस्त करण्याकडं दुर्लक्ष

close