कपिल देव यांच्या सर्वोत्तम वन डे टीमचं नेतृत्व धोणीकडे

August 16, 2013 6:38 PM0 commentsViews: 1191

dev team16 ऑगस्ट : भारताचा महान क्रिकेटपटू कपिल देव यांनी आपली सर्वोत्तम भारतीय वन डे टीम जाहीर केलीय. आणि या टीमचं नेतृत्व त्यांनी सध्याचा यशस्वी कॅप्टन महेंद्रसिंग धोणीकडे सोपवलंय.

विशेष म्हणजे 1983 मध्ये वर्ल्ड कप जिंकून देणार्‍या भारतीय टीममधल्या एकाही खेळाडूला या टीममध्ये स्थान देण्यात आलेलं नाही. कपिल देव स्वत: या वर्ल्ड कप विजेत्या टीमचे कॅप्टन होते, पण त्यांनी स्वत:लाही या टीममध्ये स्थान दिलेलं नाही.

कपिल देव यांच्या भारतीय वन डे टीममध्ये सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली यांच्यासह अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग आहेत.

close