इंटरनेटवरून साईबाबांच्या दर्शनाचं बुकिंग

January 28, 2009 11:38 AM0 commentsViews: 7

28 जानेवारी शिर्डीहरिश दिमोटे शिर्डीतल्या साईबाबांचं दर्शन आता सर्वसामान्यांना महाग होणार आहे. पण धनिकांना हे सोयीचं होणार आहे. कारण साईसंस्थान शिर्डी आता 'प्लॅन दर्शन' आणि 'पे दर्शन' योजना सुरू करणार आहे. तिरुपती बालाजीप्रमाणं ही दर्शनव्यवस्था असणार आहे. यानुसार इंटरनेटवरूनही दर्शनासाठी ऍडव्हान्स बुकिंग करता येणार आहे. 'व्हीआयपी पे' दर्शनाचीही यात सुविधा असणार आहे. जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीनं याबाबत अहवाल दिला आहे. त्यावर संस्थान लवकरच निर्णय घेणार आहे.

close