‘फिल्मी फ्रायडे’ला, ‘वन्स अपॉन’ आणि ‘गोविंदा’

August 16, 2013 9:37 PM0 commentsViews: 623

16 ऑगस्ट : या वीकेण्डला दोन सिनेमांची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे. अक्षय कुमार,सोनाक्षी सिन्हा, इम्रान खान अशी दमदार स्टारकास्ट असलेला ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई दोबारा’ हा सिनेमा प्रदर्शित झालाय. वन्स अपॉन अ टाईम इन मुंबईच्या या सिक्वलने प्रदर्शनापूर्वीपासून उत्कंठा वाढवली आहे. एकता कपूरची निर्मिती आणि मिलन लुथरियांचं दिग्दर्शन त्यामुळे बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा काय धमाल करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. विशेष म्हणजे खूप दिवसांनी अभिनेत्री सोनाली बेंद्रेनंही या सिनेमातून कमबॅक केलंय. यासोबत मराठीत गोविंदा हा सिनेमा प्रदर्शित झालाय. दुनियादारीपाठोपाठ स्वप्निल जोशीचा हा सिनेमा प्रदर्शित झालाय. दहिहंडी आणि त्यातील राजकारण आणि भावनिक गुंतागुंत यात दाखवलीय.

close