रंकाळा तलावाला प्रदूषणाचा विळखा

August 16, 2013 9:49 PM0 commentsViews: 295

सिटिझन जर्नलिस्ट डॉ. अमर आडके, कोल्हापूर

16 ऑगस्ट : कोल्हापूर म्हटलं की, डोळ्यासमोर अनेक पर्यटन स्थळ उभी राहतात. त्यातलंच एक प्रमुख पर्यटन केंद्र म्हणजे रंकाळा तलाव…मात्र हाच तलाव सध्या प्रदूषणानं ग्रासलाय. महापालिका याकडे दुर्लक्षच करतेय. कोल्हापूरचे आमचे सिटिझन जर्नलिस्ट डॉ. अमर आडके यांचा हा एक स्पेशल रिपोर्ट…

हे हिरवगार पाणी आहे रंकाळा तलावाचं…गेल्या 2 वर्षांपासून हा तलाव जलपर्णीनं ग्रासला होता. त्यानंतर महापालिकेनं कोट्यावधी रुपयांचा खर्च करुन जलपर्णी काढली मात्र आता या रंकाळ्याचं पाणी हिरवगार झालंय. पाण्यावर हिरव्या रंगाचा तवंग निर्माण झालाय. त्यामुळं कोल्हापूरचं वैभव समजल्या जाणार्‍या रंकाळ्याजवळच्या स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय.

या रंकाळा तलावावर पर्यटकांबरोबरच स्थानिक नागरिक गेले अनेक वर्षे सकाळच्या वेळी फिरायला यायची. मात्र सध्या इथल्या पाण्यात मोठी दुर्गंधी निर्माण झाल्यानं या रंकाळ्यावर येणार्‍यांना नाकाला रुमाल बांधूनच यावं लागतंय. रंकाळा तलावाच्या पाण्याचा गेली 3 वर्ष निचराच झालेला नाही. त्यातच तलावाशेजारच्या उपनगरांमधलं मैलामिश्रीत पाणी या रंकाळ्यात येऊ मिसळतंय. मात्र त्यासाठी महापालिका काहीही करायला तयार नाहीय. एकेकाळी पिण्यासाठी या तलावाचं पाणी वापरलं जायचं मात्र आज या रंकाळ्याची दुरावस्था झालेली पाहून मन हेलावतं…

close