ऑर्डर…ऑर्डर..आता कोर्टही ऑनलाईन !

August 16, 2013 7:45 PM0 commentsViews: 397

स्मिता नायर, मुंबई

16 ऑगस्ट : कोर्टात खटला दाखल करायचा असेल तर आता तुम्हाला कोर्टाची पायरी चढायची गरज नाही. कारण मुंबई हायकोर्ट आता लवकरच ऑनलाईन कोर्ट सुरू करतंय.

तारीख पे तारीख… ‘दामिनी’ सिनेमातला हा गाजलेला डायलॉग भारतीय न्यायव्यवस्थेच्या सद्यस्थितीचं अचूक विश्लेषण करतो. आजच्या घडीला भारतात जवळपास 3 कोटी खटले प्रलंबित आहेत. खटले निकाली काढण्यात होणार्‍या विलंबावर तोडगा काढण्यासाठी मुंबई हायकोर्टाने आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निश्चय केलाय. सरन्यायाधीशांच्या नेतृत्त्वाखाली मुंबई हायकोर्टाने आता ई-कोर्ट सुरू केलंय. या ईलेक्ट्रॉनिक कोर्ट किंवा डिजीटल कोर्टमध्ये खटल्याच्या सुनावणीबाबतची सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध होणार आहे.

या ई-कोर्टामध्ये…
– याचिकाकर्त्यांना पेन ड्राईव्ह किंवा सीडीच्या माध्यमातून याचिका दाखल करता येईल
– वकीलही आपले युक्तीवाद ऑनलाईन टाकतील.
– आणि न्यायमूर्ती आपल्या कॉम्प्युटरवर हा खटला पाहू आणि चालवू शकतील.

या पहिला ई-कोर्टाचे न्यायमूर्ती असणार आहेत जस्टिस नितीन जमादार. महाराष्ट्र आणि गोव्यातल्या कोर्टात पेपरवर्क कमी करणं आणि न्यायप्रक्रिया वेगवान करण्याचा या प्रयत्न नक्कीच कालसुसंगत म्हणायला हवा.

close