राजूंचा जामीन अर्ज फेटाळला

January 28, 2009 5:53 PM0 commentsViews: 6

28 जानेवारी सत्यम घोटाळ्यातले संशयित रामलिंग राजू , त्याचा भाऊ आणि सीएफओ श्रीनिवास वदलामणी यांचा जामीन अर्ज कोर्टानं पुन्हा फेटाळलाय. हे तिघंही आता 31 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत राहतील.राजूचा चौकशीसाठी ताबा मिळावा म्हणून सेबीदेखील पुन्हा याचिका दाखल करणार आहे. दरम्यान सत्यम प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिल्यास राज्य सरकारची हरकत नाही अशा आशयाचं पत्र आंध्रप्रदेश सरकारनं केंद्र सरकारला लिहीलं आहे.

close