‘सिंधुरक्षक’ दुर्घटना तांत्रिक बिघाडामुळे नाही’

August 17, 2013 3:08 PM0 commentsViews: 631

INS Sindhurakshak fire17 ऑगस्ट : आयएनएस सिंधुरक्षक पाणबुडी दुर्घटनेतल्या 13 जवानांचा शोध अजूनही सुरू आहे. दरम्यान, रशियानं या दुर्घटनेला कोणताही तांत्रिक बिघाड कारणीभूत नसल्याचं म्हटलंय आणि आवश्यकता असल्यास रशियन नेव्ही मदत करायला तयार असल्याचंही सांगितलं आहे.

पाणबुडीत पोचलेल्या स्कुबा डायव्हर्सना अंधुक प्रकाश आणि गढुळ पाण्यामुळे जवानांना शोधण्यात मोठी अडचण निर्माण झाली आहे. पाणबुडीत अडकलेल्या जवानांच्या कुटुंबीयांशी नौदल सतत संपर्कात आहे.

दोन दिवसांपुर्वी मुंबईतील डाक यार्ड इथं सिंधुरक्षक पाणबुडीवर दोन स्फोट होऊन भीषण आग लागली. या आगीत पाणबुडीला जलसमाधी मिळाली. या पाणबुडीवर 18 जवान होते. 18 जवानांना मृत्यू झाला अशी भीती आहे मात्र नौदलाकडून बचावकार्य सुरू आहे.

गुरूवारी नौदलाच्या स्कुबा डायव्हर्सनी पाच जवानांचे मृतदेह बाहेर काढले. यातील तीन मृतदेहांची ओळख होणं मुश्लिकल असल्यामुळे डीएनए चाचणीसाठी पाठवण्यात आले आहे.आजही शोधकार्य सुरू आहे.

close