1991 च्या पुनरावृत्तीचा प्रश्नच नाही -पंतप्रधान

August 17, 2013 5:10 PM1 commentViews: 398

Image img_235062_pmonrahulgandhi_240x180.jpg17 ऑगस्ट :देशाची अर्थव्यवस्था सध्या चिंताजनक आहे. देशात एकीकडे मंदीचं वातावरण असल्याची चर्चा सुरू झाली असतानाच शेअर बाजारासाठी कालचा दिवस ब्लॅक फ्रायडे ठरला. त्यातच भर म्हणून की काय रुपयाचीही पुन्हा एकदा पडझड झाली.

पण 1991 सारखं आर्थिक संकट येण्याचा प्रश्नच नाही, असा दावा पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलाय. देशाची अर्थव्यवस्था बळकट असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

तर सध्याच्या घडामोडींमुळे घाबरण्याची गरज नसल्याचं केंद्र सरकारनं म्हटलंय. निवडणुकीनंतरच ही आर्थिक अस्थिरता संपू शकते, असं विरोधक आणि अर्थतज्ज्ञांचं मत आहे.

  • Haresh Dugade

    no problem…. 2014 dur nhi hai..

close