छावा-शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी

August 17, 2013 5:27 PM2 commentsViews: 3090

mete program17 ऑगस्ट : औरंगाबादमध्ये आमदार विनायक मेटे यांच्या मराठा आरक्षण जागर परिषदेत छावाच्या कार्यकर्त्यांनी राडा केला. मेटे यांची परिषद उधळून लावण्यासाठी छावाचे कार्यकर्ते परिषदेत घुसले. मात्र विनायक मेटे आणि छावाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान मारामारी झाली.

यावेळी विनायक मेटे मंचावर उपस्थित होते. त्यांनाही धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाला. या मारामारीत छावाचे तीन कार्यकर्ते जखमी झाले. तर एका स्थानिक वृत्तपत्राच्या छायाचित्रकारालाही मेटे यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आणि त्याचा कँमेरा फोडला.

मेटे यांची परिषद चालू असतांना छावाच्या दुसर्‍या गटानं परिषदेच्या स्वागत कमानीवरील विनायक मेटे यांच्या पोस्टरला आग लावली. एकंदरीतच विनायक मेटे आणि छावाच्या कार्यकर्त्यांच्या संघर्षामुळे जागर परिषद भागात रणभूमीचं स्वरूप आलं होतं.

  • Abhijeet Jadhav

    maramari karaichi asel tar ….congress leaders la mara

  • Shoeb Sayed

    everything is going on 4 money,

close