बीडमधल्या कारखान्यातील स्फोटात 8 ठार

January 28, 2009 10:38 AM0 commentsViews: 1

28 जानेवारी बीड गणेश नवले बीड जिल्ह्यात नेकणूर गावाजवळ एका कारखान्यात स्फोट होऊन 8 जण ठार झाले. तर 7 जण जखमी झाले आहेत. शेख सलीम शहानूर यांच्या चंदन फायर वर्क्स या कारखान्यात हा स्फोट झाला. या कारखान्यात शोभच्या दारूची निर्मिती होत होती. स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की कारखान्याच्या शेड्सचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. मृतांमध्ये 13 ते 20 वयोगटातील मुलींचा समावेश आहे. या मुली फटाक्यांमध्ये दारू भरण्याचं काम करत होत्या. आणखी स्फोट होण्याच्या भीतीमुळे मदतकार्यातही अडचणी येत होत्या.

close