कोळसा घोटाळ्याशी संबंधित फाईल्स गहाळ

August 17, 2013 9:15 PM0 commentsViews: 39

Image img_216722_coal_240x180.jpg17 ऑगस्ट : कोळसा खाण वाटप प्रकरणात सरकार पुन्हा एकदा अडचणीत आलंय. कोळसा मंत्री श्रीप्रकाश जायस्वाल यांनी खाण वाटप प्रकरणाच्या फाईल्स गहाळ झाल्या असल्याचं मान्य केल्यानं आता नवाच वाद उफाळलाय.

या सगळ्या प्रकरणाबद्दलच्या 1993 ते 2004 पर्यंतच्या फाईल्स गहाळ झाल्या असल्याची माहिती मिळतीये. विरोधकांनी याबद्दल सरकारवर जोरदार टीका केलीयं.

सरकार या घोटाळ्याच्या चौकशीत हस्तक्षेप करून आपल्या चुकांवर पांघरूण घालण्याचा आणि पंतप्रधानांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय.

close