भ्रष्टाचारी संघटकांची हकालपट्टी करा नाहीतर बंदी कायम

August 17, 2013 4:21 PM0 commentsViews: 309

ioa17 ऑगस्ट :आंतराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने भारताला निर्वाणीचा इशारा दिलाय. भ्रष्टाचाराचा आरोप असणार्‍या संघटकांना निवडणूक लढवण्याची परवानगी देण्यासाठी घटनेत बदल करण्याची विनंती भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं केली होती.

आयओएनं ही विनंती सपशेल धुडकावून लावलीय. घटनेचं उल्लंघन केल्यास भारतीय संघटनेवरील बंदी कायम राहील असा इशाराच आयओएनं दिलाय. भ्रष्टाचाराचा आरोप असला तरी भारतात लोकसभेची निवडणूक लढवता येते असा युक्तीवाद भारतीय ऑलिम्पिक संघटनेने केला होता.

तो आयओएनं फेटाळून लावला. आयओएच्या या निर्णयानुसार आता भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे विद्यमान अध्यक्ष अभय चौताला आणि कॉमनवेल्थ भ्रष्टाचारात अडकलेले ललित भानोत अपात्र ठरणार आहेत. आणि यासाठीच भारतीय ऑलिम्पिक संघटना आयओएची घटना मान्य करायला तयार नाही.

close