मुंडे बीडमधून निवडणूक लढणार

January 28, 2009 2:46 PM0 commentsViews: 60

28 जानेवारीबीडमधून लोकसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांनी केलीय. ते बुलडाणा जिल्ह्यात बोलत होते. शरद पवार स्वतःचा जिल्हा सोडून बीड जिल्ह्यात निवडणूकीसाठी उभे राहणार नाहीत, असं मतही त्यांनी नोंदवलं. बेळगावच्या मुद्यावर सेना भाजपची युती तुटणार नाही आणि ती तोडण्याचा प्रश्नच येत नाही, असंही मुंडे यांनी स्पष्ट केलं."मी लोकसभा निवडणूक लढवणार आहे. माझी इच्छा आहे की मी बीडमधून निवडणूक लढावी. पण अजून शिवसेनेबरोबर वाटाघाटी झाल्या नाहीत. त्या झाल्यानंतरच अंतिम निर्णय होईल. मात्र माझी स्वत:ची बीडमधून निवडणूक लढण्याची इच्छा आहे." असं मुंडे म्हणाले.

close