87वं अ.भा.साहित्य संमेलन 3 जानेवारीला

August 17, 2013 10:14 PM0 commentsViews: 131

samelan417 ऑगस्ट : पुण्यातल्या सासवड इथं होणार्‍या 87व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 3,4 आणि 5 जानेवारी 2014 रोजी हे साहित्य संमेलन पार पडेल.

यावर्षी नवीन प्रयोग म्हणून ग्रंथदिंडीऐवजी ‘ग्रंथघोष’ केला जाणार आहे. मुख्य म्हणजे या कार्यक्रमात शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी संतवचनांपासून सावरकरांपर्यंतच्या साहित्यावर विचार व्यक्त करतील.

त्याचप्रमाणे ‘झेंडूची फुले’ ह्या विंडबनात्मक कवितांच्या विशेष कार्यक्रमाचाही यात समावेश आहे.

close