मुंबईचा अमित रॉय यंदाच्या महाराष्ट्र श्री

January 28, 2009 10:45 AM0 commentsViews: 4

28 जानेवारी महाडयंदाच्या महाराष्ट्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धेचं यजमानपद भूषवलं ते महाडनं. मुंबईचा अमित रॉय यंदाच्या महाराष्ट्र श्री किताबाचा मानकरी ठरला आहे. महाडमध्ये रंगलेल्या या स्पर्धेस प्रेक्षकांचाही उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. खेळाडूंनीही पिळदार शरीरसौष्ठवाचं अफलातून प्रदर्शन करीत प्रेक्षकांची वाहवा मिळवली.यंदाच्या महाराष्ट्र श्री स्पर्धेत जबरदस्त चुरस होती. मुंबई पुण्यासह नाशिक, औरंगाबाद, नागपूरच्या बॉडीबिल्डर्सनीही जबरदस्त टफफाईट दिली. पण अखेर मुंबईच्या अमित रॉयनं बाजी मारली. शिवसेना नेते खासदारअनंत गिते यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. महाराष्ट्र श्री सोबतचं महाड श्री शरीर सौष्ठव स्पर्धेचंही आयोजन करण्यात आलं होतं. नितीन रोडगेनं महाड श्रीचा किताब पटकावला. यावेळी तळवलकर जिमचे संचालक मधुकर तळवलकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. बॉडीबिल्डींग संघटनेचे पदाधिकारी पपी पाटील विकी गोरक्ष आणि आयोजक भरत गोगावले यावेळी उपस्थित होते.

close