‘लालदिवा वापरणं हे ब्रिटिश राजवटीचं लक्षण’

August 19, 2013 3:27 PM0 commentsViews: 742

vip car19 ऑगस्ट : लाल दिव्याची गाडीची हाव असणार्‍यांना सुप्रीम कोर्टाने चांगलंच फटकारलं. लालदिवा वापरणं हे ब्रिटिश राजवटीची आठवण करून देणारं आहे असं नोंद करत सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारवर कडक शब्दात ताशेरे ओढले.

लाल दिव्याच्या गाडीचा एवढा हाव कशाला असा सवालही कोर्टाने विचारलाय. व्हीआयपींच्या सुरक्षेचा फेरआढावा घेण्याचे सर्व राज्य सरकारांना आदेशही देण्यात आले आहे.

हायकोर्टाच्या न्यायाधीशांच्या नेतृत्वाखालच्या समितीकडून याबाबतचा नियमित आढावा घ्यावा, असंही कोर्टाने म्हटलंय. तसंच व्हीआयपींना लाल दिवा वापरण्यासाठी केलेल्या व्याख्येवर कोर्टाने असमाधान व्यक्त केलं आहे. व्हीआयपींच्या सुरक्षेवर होणार्‍या खर्चावर या अगोदरही चर्चा झाली होती.

close