फाईल गहाळ प्रकरणावरून राज्यसभेत गदारोळ

August 19, 2013 3:38 PM0 commentsViews: 174

raja sbha19 ऑगस्ट : कोळसा खाणवाटपाच्या फाईल्स गहाळ प्रकरणावरून आज राज्यसभेत मोठा गदारोळ झाला. विरोधकांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडून याबाबत स्पष्टीकरण मागितलं.

याप्रकरणी कोळसा खाणवाटपातले लाभार्थी, छाननी समिती आणि कोळसा मंत्रालयाची चौकशी करायला हवी, अशी मागणी भाजपने केली. इतका मोठा गुन्हा होत असताना पंतप्रधानांनी बघ्याची भूमिका घेतली, असा आरोप राज्यसभेतले विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनी केला.

पण केंद्र सरकारनं मात्र फाईल्स गहाळ झाल्याप्रकरणी हात झटकण्याचे प्रयत्न केलेत. या फाईल्स राज्य सरकारांकडे, असतील असा दावा केंद्र सरकारनं केलाय. कोळसा खाणवाटपाशी संबंधित काही फाईल्स गहाळ झाल्याची कबुली खुद्द कोळसामंत्री श्रीप्रकाश जयस्वाल यांनी शनिवारी दिली होती.

close