‘मद्रास कॅफे’ला तामिळी संघटनांचा विरोध

August 19, 2013 1:41 PM0 commentsViews: 640

madras cafe19 ऑगस्ट : अभिनेता जॉन अब्राहमचा आगामी ‘मद्रास कॅफे’हा चित्रपट वादात सापडलाय. चेन्नईमधल्या काही तामिळ संघटनांनी हा चित्रपट प्रदर्शित करायला विरोध केला आहे.

या चित्रपटात लिट्टे (LTTE) आणि त्याचा प्रमुख प्रभाकरनचं नकारात्मक चित्र रंगवल्याबद्दल चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी संघटनांने केलीय.  मद्रास कॅफेचं चित्रपटाचं खास स्क्रिनिंग पाहिल्यानंतर शुजित सरकार यांनी हा चित्रपट तामिळींच्या विरोधात बनवला असल्याचा आरोप या संघटनांनी केलाय.

यापूर्वी पीएमकेचे प्रमुख रामादोस यांनीही राज्य आणि केंद्र सरकारने या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली होती. आता अन्य संघटनांनी याविरोधात आंदोलन करण्याचाही इशारा दिलाय.

close