रूपयाची घसरगुंडी सुरूच

August 19, 2013 1:35 PM0 commentsViews: 119

indin rupes19 ऑगस्ट : रूपयाची घसरण अजूनही सुरूच आहे.आज सकाळी शेअर बाजार सुरू झाल्यानंतर अर्थव्यवस्थेला पुन्हा धक्का बसला. रूपया उघडला तोच मुळी 62 रुपयांपेक्षा कमी भावावर. रुपयाची घसरण होऊन डॉलरमागे रूपयाचा भाव 62 रूपये 70 पैसे झालाय.

याचा परिणाम शेअर बाजारावरही जाणवला. सेन्सेक्स जवळपास 300 अंकांनी घसरला. तर निफ्टीही 50 अंशांनी घसरत 5400 पर्यंत खाली गेला. सप्टेंबर 2012 पासून निफ्टीतली ही सर्वात मोठी घसरण आहे. शुक्रवारी बाजार बंद झाला तेव्हा त्याचा भाव डॉलरमागं 61 रुपये 65 पैसे इतका होता.

close