तारेच्या फासातून बिबट्याची सुखरूप सुटका

August 19, 2013 5:55 PM0 commentsViews: 145

19 ऑगस्ट : भक्ष्याच्या शोधात वस्तीत येणार्‍या बिबट्यांना तारेचा फास लावून मारण्याचे प्रयत्न रत्नागिरी जिल्ह्यात सुरूच आहेत. मुरुडमधल्या बोवनेवाडीत तारेच्या फासात अडकलेल्या बिबट्याची वनविभाग आणि ग्रामस्थांनी दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर सुटका केली. जर आणखी थोडा उशीर झाला असता तर या बिबट्यांचा मृत्यू झाला असता अशी माहिती पशु वैद्यकीय अधिकारी रवींद्र बर्वे यांनी दिली. या बिबट्याचं वय साडेतीन वर्षं असून त्याला प्राथमिक उपचारानंतर चांदोलीच्या जंगलात सोडण्यात येणार असल्याचं समजतंय. गेल्या दोन वर्षात रत्नागिरी मधल्या लांजा संगमेश्वर आणि दापोली भागात मानवी वस्तीत येणार्‍या बिबट्यांचं प्रमाण वाढत आहे. गेल्या वर्षभरात सात बिबट्यांचा फासात अडकून मृत्यू झालाय. मात्र तरीही पुरेशा साधनामुळे गेल्या दोनवर्षात वनविभागाकडून कोणतीही ठोस उपाय योजना राबवली गेली नाही.

close