संप करून जनतेला वेठीस धरू नका:हायकोर्ट

August 19, 2013 6:23 PM0 commentsViews: 177

Image img_160152_ladieshighcourt.transfer.jpg45yuhjn_240x180.jpg19 ऑगस्ट : संप करून सामान्यांना वेठीस धरणार्‍या शरद राव आणि रिक्षाचालकांना मुंबई हायकोर्टाने फटकारलंय. जनतेला वेठीस धरू नये, असं हायकोर्टाने शरद रावांना सुनावलंय.

21 ऑगस्टपासून तीन दिवस रिक्षाचालकांनी संप पुकारला होता. या प्रस्तावित संपाच्या विरोधात मुंबई ग्राहक पंचायतीने जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर हायकोर्टामध्ये सुनावणी झाली.

आज ग्राहक पंचायतीची बाजू ऐकून घेण्यात आलीये, तर उद्या शरद रावांना आपलं म्हणणं कोर्टासमोर मांडावे लागणार आहे. त्यानंतर उद्या रिक्षा संपावर सुनावणी होणार आहे.

close