इंधन टाकीत गळतीमुळे ‘GSLV-D5’चं उड्डाण रद्द

August 19, 2013 5:16 PM0 commentsViews: 247

GSLV-D519 ऑगस्ट : इंधनाच्या टाकीत गळती झाल्यानं जीएलएलव्ही-डी 5 (GSLV-D5)चं प्रक्षेपण अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलंय.प्रक्षेपणाची तयारी सुरू असताना ही तांत्रिक चूक लक्षात आली आणि त्यांनंतर हा प्रक्षेपण थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. जीएसएटी 14 (GSAT 14) हा दळवळणासाठीचा उपग्रह जीएलएलव्ही-डी 5 च्या मदतीनं सोडण्यात येणार होता. विशेष म्हणजे तीन वर्षांपूर्वीही या GSLV-D3चं प्रक्षेपण अयशस्वी झालं होतं.

आज संध्याकाळी 4 वाजून 50 मिनिटाने जीएसएटी 14 उपग्रहाचं उड्डाण निश्चित करण्यात आलं होतं. पण ऐनवेळी चूक लक्षात आल्यामुळे हे उड्डाण थांबवण्यात आलं. जर हे उड्डाण झालं असतं तर अंतराळ संशोधनात भारताची ही कामगिरी एक मैलाचा दगड ठरली असती. या मोहिमेतून क्रायोजेनिक इंजिन बनवणार्‍या देशांच्या पंक्तीत भारताला स्थान मिळाले असते.जीएलएलव्ही-डी 5 च्या वरच्या भागात क्रायोजेनिक इंजिन बसवण्यात आलंय.

 

क्रायोजेनिक इंजिनमध्ये शुन्यपेक्षा कमी तापमानात ऑक्सिजन आणि हायड्रोजनचा इंधन म्हणून वापर केला जातो. या अगोदर 15 एप्रिल 2010 रोजी क्रायोजेनिक इंजिन असलेल्या जीएलएलव्ही-डी 3 ची उड्डाण अपयशी ठरली होती. आज जर हे उड्डाण यशस्वी ठरले असते तर येणार्‍या काळात अंतराळ शोधमोहिमेसाठी भारताचा मार्ग मोकळा झाला असता. भारत चांद्रयान मोहिमेसह अंतराळविरांना पाठवणेही यामुळे शक्य झाले असते.

 

दुसरी गोष्ट अशी की, या मोहिमेच्या मदतीसाठी भारताला कोणताही देश मदत करत नाहीऐ. सध्या भारताकडे रशियाकडून मिळालेलं एकच क्रायोजेनिक इंजिन आहे. भारताला आपल्या पीएसएलव्ही रॉकेटसाठी या इंजिनची गरज असून याद्वारे तीन टनपेक्षा जास्त उपग्रहांना अंतराळ पाठवू शकतो. 1994 च्या नंतर भारताने आपल्या पीएसएलव्ही रॉकेट द्वारे 23 यशस्वी उड्डाण केली आहे.

close