पोलिसांचीच वेबसाईट हॅक

August 19, 2013 8:40 PM0 commentsViews: 356

nanded police hack19 ऑगस्ट : एरवी सायबर गुन्ह्यांचा शोध पोलीस घेत असतात. मात्र पोलिसच सायबर गुन्हाचे टार्गेट झाले आहेत. नांदेडमध्ये पोलिसांचीच वेबसाईट हॅक करण्यात आलीयं.

त्यामुळे या वेबसाईटवरची सगळी माहिती गायब झालीयं. या वेबसाईटवर नांदेडच्या पोलीस अधिकार्‍यांची माहिती तसंच त्यांचे मोबाईल नंबर्सही होते.

याशिवाय धार्मिक स्थळं, प्रेक्षणीय स्थळं याबाबतीतली सगळी माहिती होती. आता मात्र या वेबासाईटवर सांकेतिक भाषा दिसतीयं. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांनी हैदराबादच्या फॉरेन्सिक विभागाला कळवण्यात आलं. आता हा खोडसाळपणा कोणी केलाय याचा शोध पोलीस घेत आहे.

close