राज्यभरातील 25 हजार महसूल कर्मचारी संपावर

August 19, 2013 8:55 PM0 commentsViews: 126

beed samp19 ऑगस्ट : राज्यभरातील तब्बल 25 हजार महसूल कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी चार दिवसांपासून संपावर गेले आहेत. यामुळे सर्व तहसील कार्यालयं ओस पडली असून सर्वसामान्य नागरिकांची कामं ठप्प झाली आहेत. महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेनं 16 ऑगस्टपासून प्रलंबित 24 मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे.

बीड जिल्ह्यातील महसुल कर्मचारी संघटनेच्या वतीने हा संप पुकारण्यात आला आहे. या संपामुळे जिल्ह्यातील अकरा तहसील कार्यालय तसंच जिल्हाधिकारी कार्यालय हे कर्मचार्‍यांअभावी ओस पडली आहेत. हे कर्मचारी आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी मागील चार दिवसापासून संपावर आहेत. दरम्यान या संपामुळे सर्वसामान्य नागरिकांचे मात्र अतोनात हाल होतायत.

2006 च्या आकृतीबंधानुसार अव्वल कारकून संवर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर पदोन्नती देण्यात यावी. चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांच्या मुलास शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावं. नवनिर्मित तालुक्यामध्ये महासुलेतर कामासाठी पदनिर्मिती करण्यात यावी. प्रत्येक तालुक्यासाठी खनिकर्म निरिक्षकाचं पद निर्माण करावं यासह इतर मागण्यांसाठी महसूल कर्मचारी संपावर गेले आहेत. या संपात बीड जिल्ह्यात सव्वा चारशे कर्मचारी सहभागी झाले आहेत.

close