विद्यार्थिनींचा शाळेतच मुक्काम होस्टेल मात्र धूळ खात !

August 19, 2013 9:27 PM0 commentsViews: 104

अलका धुपकर, कर्जत

19 ऑगस्ट : रायगड जिल्ह्यात आदिवासींसाठी पाच आश्रमशाळा आहेत. यापैकी कर्जत तालुक्यातल्या भालीवडीच्या आश्रमशाळेतल्या 500 मुलींना राहायची सोयच नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. वर्ग संपल्यानंतरही या मुली वर्गातच मुक्काम करतात. शाळेच्या आवारात नव्यानं बांधलेली होस्टेलची इमारत सार्वजनिक बांधकाम विभागानं शाळेच्या ताब्यात न दिल्यामुळे मुलींवर ही परिस्थिती ओढवली आहे.

भालीवडीची सरकारची मुलींची आश्रमशाळा…त्याशेजारी बांधलेली होस्टेलची इमारत वापरली का जात नाही…याची बातमी करण्यासाठी आम्ही कर्जतला पोचलो. पण, भालिवडीच्या आश्रमशाळेचे अधीक्षक टी एस वाघमारे यांनी कॅमेरा बंद करायला लावून विद्यार्थिनींच्या मदतीनं कॅमेर्‍यामनला गेटबाहेर ढकललं. पण, रितसर परवानगी घेऊन आम्ही आवारात पोचलो. 40 लाख रुपये खर्च केलेली ही होस्टेलची इमारत बांधून तीन वर्ष झालीयत. तरीही विद्यार्थिनींना मात्र इथं राहू दिलं जात नाही. आणि आदिवासी विकास विभागाच्या लाल फितीच्या कारभाराचा फटका विद्यार्थीनींना बसतोय.

close